कर्जत (प्रतिनिधी) :- डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये जि. प. प्राथमिक शाळा बेलगाव ने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सदर शाळा डिजिटल शाळा, वाचनालय , क्रीडांगण , गुणवत्ता, परसबाग, बगीचा, खेळणी ने समृद्ध असून शाळेत CSR च्या माध्यमातून मल्टी पर्पझ हॉल चे 27 लाखांचे काम झाले आहे. विद्यार्थी गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांचा प्रत्येक उपक्रमात कृतीयुक्त सहभाग असतो.विद्यार्थ्यांनी केंद्र व तालुका पातळीवर विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आनंदी बाजार, बालआनंद मेळावा असे अनेक उपक्रम राबवले जातात.संपूर्ण बेलगाव ग्रामस्थ , ग्रामपंचायत,शाळा व्यवस्थापन समिती , पालक यांच्या सहकार्याने एक तालुक्यातील आदर्श शैक्षणिक संकुल येथे उभारले गेले आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील एक अग्रणी व गुणवत्ता पूर्ण शाळा म्हणून ही शाळा आपला नावलौकिक मिळवत आहे.
तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. गायकवाड मॅडम, बिटचे विस्तार अधिकारी लगड साहेब , धादवड साहेब, केंद्रप्रमुख त्र्यंबके साहेब , गायकवाड साहेब,लबडे साहेब,तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख नेहमीच शाळेला बहुमोल मार्गदर्शन करतात. आज त्याचाच परिणाम स्वरूप शाळा आपली गुणवत्ता व मान टिकवून आहे. सर्व ग्रामस्थ बेलगाव , शाळा व्यवस्थापन समिती,केंद्र व तालुक्यातील अधिकाऱ्यांनी,शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांचे कौतुक केले आहे.



