कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील एमआयडीसी च्या प्रस्तावित जागेची औद्योगिक विकास महामंडळाचे जॉईंट सीईओ भंडारी यांनी आज सोमवारी पाहणी केली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे उपस्थित होते.
मुंबई येथे (दि.२८ फेब्रुवारी) रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आ प्रा राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत कर्जत तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या जागेबाबत बैठक झाली होती, या बैठकीत एमआयडीसी ची जागा कोंभळी, रवळगाव, थेरगाव परिसरात प्रस्तावित करण्यात आली होती.
त्याच अनुषंगाने औद्योगिक विकास महामंडळाचे जॉईंट सीईओ भंडारी यांनी आज सोमवारी पाहणी केली.सर्व बाबीची पूर्तता करण्यात येणार आहे .क्षेत्र २५० हेक्टर पेक्षा जास्त असल्यामुळे महामंडळाचे जॉईट सीईओ भंडारी हे जमिनी बाबतचा भूअहवाल सादर करणार आहेत आणि तो अहवाल उच्य स्तरीय समितीपुढे सादर होणार आहे . २८ फेब्रुवारीच्या बैठकीत कोंभळी, रवळगाव थेरगाव येथील जागेबाबत मंत्री उदय सामंत आणि सर्व अधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली होती, आता जागेचा अहवाल सादर होऊन 5 मार्च रोजी कर्जत येथील एमआयडीसीला तत्त्वता मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
औद्योगिक विकास महामंडळाचे जॉईंट सीईओ भंडारी यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी त्यांच्याशी जागेबाबत सविस्तर चर्चा केली, त्यावेळी गवळी यांनी सदर जागेबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.
यावेळी रिजनल ऑफिसर गवळी, तलाठी राहुल खताळ, सुनिल खंडागळे, संतोष शेलार, किशोर तांदळे यांच्यासह एमआयडीसी चे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.



