कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या प्रस्तावित जागेचा सदोष प्रस्ताव नाकारल्यानंतर तो औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून नागपूर येथील अधिवेशन काळात त्याबाबत सरकारकडे आ प्रा .राम शिंदे यांनी पाठपुरावा केला आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लवकरात लवकर जागा सुचवाव्यात म्हणून औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या समवेत व आ प्रा राम शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जागे संदर्भात बैठक होऊन चार जागांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते . त्यापैकी कोंभळी, रवळगाव, थेरगाव येथील जागेला औद्योगिक महामंडळाच्या अधिकार्यांनी मान्यता दिली आहे, त्यामुळे कायम अवर्षणग्रस्त असलेल्या कोंभळी परिसराचा कायापालट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईतील अधिवेशन काळातच औद्योगिक वसाहतीला तत्वतः मान्यता मिळणार होती परंतु क्षेत्र ५०० हेक्टर असल्याने जॉईट सीइओ एमआयडीसी यांची पाहणी बाकी होती त्यामुळे तो विषय त्या काळात उच्य अधिकार समिती पुढे आला नाही, दरम्यान संबंधित अधिकारी यांनी नियोजित जागेला भेट देऊन शासनाला अहवाल सादर केला आणि त्यासंदर्भात उच्य अधिकार समितीने निर्णय घेऊन कोंभळी, रवळगाव, थेरगाव औद्योगिक वसाहतीस तत्वतः मान्यता दिली आहे.
औद्योगिक वसाहतीस आवश्यक असणारे क्षेत्र कमी किंमती मध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे . हा भाग अवर्षण प्रवण असल्याने बागायती शेती नाही . जवळच राष्ट्रीय महामार्ग आहे . पाण्यासाठी सीना धरण जवळच आहे . या भागात औद्योगिक वसाहती मुळे कायापालट होणार आहे त्यामुळे नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे . आ प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे आणि धोरणामुळेच या अवर्षण प्रवण भागाला न्याय मिळाला असल्याची भावना मिरजगाव परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे . त्यामुळे भाजप तालुकध्यक्ष शेखर खरमरे यांनी आ राम शिंदे यांचे त्रण व्यक्त करत आभार मानले .
मविआ सरकार असताना त्यांना एमआयडीसी साठीची तत्वतः मान्यता मिळवता आली नाही . या मुद्दयाचा वापर फक्त तरुणांची माथी भडकाविण्यासाठी करायचा त्यांचा मनसुबा तत्वतः मान्यता मिळण्याने पुर्णतः उखडला आहे . अशी प्रतिक्रिया श्री शेखर खरमरे यांनी दिली आणि महायुती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित ..पवार व उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब व या भागाचे भूमिपुत्र आ . श्री राम शिंदे साहेब यांचे आभार मानून नागरिकांच्या वतीने धन्यवाद दिले .
अवर्षण प्रवण भागाचा कायापालट या औद्योगिक वसाहतीमुळे होणार आहे . . सदोष प्रस्तावित जागेमुळे आणि स्थानिक लोकांच्या विरोधामुळे ज्या जागेला एमआयडीसी साठी मंजुरी मिळाली नाही परंतु मंजुरी मिळाली म्हणत खोटी आवई उठवत हार, तुरे आणि अभिनंदाचे फलक झळकावले . ते कर्जत जामखेडचे आमदार आता प्रस्तावित एमआयडीसी च्या कामात दुसर्याच्या खाद्यांवर बंदूक ठेवून राजकारणासाठी मुद्दाम निशाणा साधत खोडा घालत असतील तर तालुक्यातील जनता त्यांना माफ करणार नाही.
आ प्रा राम शिंदे साहेब यांनी तत्वतः मंजुरी मिळाल्याचे इतिवृत्ताची माहिती दिली आहे . . एमआयडीसी मंजूर म्हणणाऱ्या आ .रोहीत पवार यांनी तत्वतः मंजुरीचे पत्र कधी प्रकाशित केले नाही . जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा डाव यामुळे उघड झाला आहे . . कोंभळी सारख्या अवर्षण प्रवण भागात एमआयडीसी होण्यामुळे या भागाचा कायापालट होणार आहे.
- शेखर खरमरे (भाजपा तालुकाध्यक्ष)


