कर्जत (प्रतिनिधी) : नगर सोलापूर महामार्गावर तालुक्यातील कोकणगाव जवळ आज दुपारी ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एक युवक ठार झाला आहे.
निखिल धनंजय काकडे (रा अहमदनगर) कर्जत वरून अहमदनगर च्या दिशेने जात असताना मालट्रक (टी एन 52एच 5027) आणि दुचाकी (एम एच 16 डिके 1724) यांचा अपघात झाला, यामध्ये निखिल धनंजय काकडे (रा अहमदनगर) हे ठार झाले, घटनेची माहिती मिळताच मिरजगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गाडे, ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काकडे यांना लहू बावडकर यांच्या रुग्णवाहिकेने मिरजगाव येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले.


