कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या कोंभळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनुराधा साहेबराव काकडे यांची निवड झाली आहे. मंगळवारी (दि. २ एप्रिल) रोजी बोलवण्यात आलेल्या विशेष बैठकीत ही निवड झाली आहे. 

कर्जत तालुक्यातील कोंभळी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीबाबत विशेष बैठक कोंभळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मावळत्या सरपंच ज्योती सचिन दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी अनुराधा साहेबराव काकडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, सरपंच पदासाठी अनुराधा काकडे यांचा एकमेव आल्यामुळे सरपंच पदासाठी सर्वानुमते त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

 या विशेष बैठकीसाठी  स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास पॅनलप्रमुख दिपक गांगर्डे, मारुती उदमले, बाळासाहेब निवृत्ती गांगर्डे, सविता उदमले, शर्मिला गांगर्डे, स्वाती दत्तात्रय काकडे आदी उपस्थित होते. दरम्यान नवनिर्वाचित सरपंच अनुराधा काकडे यांचा यावेळी उपस्थितांनी सत्कार करून अभिनंदन केले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास आजबे व  अनिल भोईटे यांनी काम पाहिले.

यावेळी राहुल गांगर्डे, दत्तात्रय काकडे, साहेबराव काकडे, नितीन उदमले, राहुल विष्णू गांगर्डे, राजेंद्र रामचंद्र गांगर्डे, सुनील खंडागळे, शरद काकडे,अतुल गांगर्डे,  दीपक काकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहोत, तसेच आगामी काळात विविध योजना गावात राबविण्याबाबत व विकास कामांबाबत प्रभावीपणे काम करणार आहोत. 

- अनुराधा साहेबराव काकडे( नवनिर्वाचित सरपंच, कोंभळी)