कर्जत (प्रतिनिधी) : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन पराग मिल्क संचलित जय श्रीराम दूध संकलन केंद्राचे संचालक चेअरमन अनिल गांगर्डे यांनी केले. ते तालुक्यातील कोंभळी येथे दूध अनुदानासाठी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अचूक भरून शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी चांगले काम केल्याबद्दल परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून अनिल गांगर्डे यांचा सत्कार करण्यात आला , त्यावेळी बोलत होते.

चेअरमन अनिल गांगर्डे पुढे बोलताना म्हणाले की, दूध अनुदानासाठी माहिती अचूकपणे भरणे गरजेचे होते, त्या माहितीमध्ये काही चुका झाल्या होत्या, त्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही खा सुजय विखे पाटील यांना मुदतवाढ मागितली होती, त्यांनी तात्काळ दखल घेत मुदतवाढ दिली होती, त्यानंतर सर्व माहिती पडताळून शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली, अपलोड केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात ९९ टक्के अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. राहिलेले अनुदान लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाचे आभार.

यावेळी बोलताना गोरख गांगर्डे म्हणाले की, दुधाला कमी बाजार असल्यामुळे राज्य शासनाने दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर केले आणि ते अनुदान शेतकऱ्यांना मिळाले असून त्यामुळे राज्य शासनाचे व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानतो.

दरम्यान तुषार तापकीर बोलताना म्हणाले की, पराग मिल्कचे शेतकऱ्यांना कायम सहकार्य असतेच त्याचबरोबर जय श्रीराम दूध संकलन केंद्राचे संचालक अनिल गांगर्डे यांनी अथक परिश्रम घेत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले त्याबद्दल पराग मिल्क व अनिल गांगर्डे यांचे आभार.

यावेळी अमोल गांगर्डे, गोरख गांगर्डे, तुषार तापकीर, निलेश काकडे, नितीन गांगर्डे, सतीश भापकर, दिलीप जोगदंड, प्रविण गांगर्डे, अनिल गांगर्डे, विलास काकडे, अक्षय गांगर्डे, आत्माराम गोरखे, संपत गोरखे आदींसह दुधउत्पादक शेतकरी उपस्थित होते.