कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यातील मिरजगाव पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत, कत्तली साठी घेवून जाणाऱ्या ४१ गोवंशीय जातीच्या जनावंराची सुटका केली आहे तसेच ८ टन वजनाचे गोवंश जातीच्या मांसासह एकूण २१ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना तालुक्यातील निंबोडी शिवारातून एका आयशर टेम्पोमधून गोवंश जातोचे मांस व एका पिकअप मधून गोवंश जनावरे व वासरे कत्तलीकरीता काही इसम घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली होती.
सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी पथकासह निंबोडी शिवारात छापा टाकला, त्याठिकाणी इम्रान बाबा शेख, वय ३२ वर्ष, रा. बार्शी नाका, ख्वाजानगर, बीड, , जमीर बशीर पठाण, वय ५४ वर्ष, योगेश रविंद्रसिंग परदेशी, वय- ४५ वर्षे, रा- खडकपूरा गल्ली, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर, मुसविर अजिज कुरेशी, वय ३१ वर्षे, अल्फेश समोर कुरेशी, वय- १७ वर्षे दोन्ही रा. खडकत, ता. आष्टी, जि. बीड. असे तेथे मिळून आले व त्यांच्या जवळ गोमांस भरलेला टेम्पो क्र. MH ०४ FU ६२२० हा मिळून आला. तेथे ते वापरत असलेल्या पाच मोटारसायकली व एक स्विफ्ट कार असे मिळून आले. व काही अंतरावर एक पिकअप वाहन क्र. MH ४५ २७३३ यामध्ये कत्तली साठी आणलेली एकूण ३८ गोवंश जातोची वासरे मिळून आले व जवळच कत्तलीसाठी आणलेल्या एकूण ८ गायी मिळून आल्या आहेत. ताब्यात घेतले आरोपींचे इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एकूण २१ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,
कारवाईमधील आरोपींना पोलीस ठाण्यात आणुन त्यांच्याविरुध्द मिरजगाव पोलीस स्टेशन गुरजिनं. १२०/२०२४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधि, १९९५ चे कलम ५ (बी), ५(सी), ९, ९(ए), ११(१) (घ) सह भादंवि कलम ४२९, ३४ प्रमाणे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर सदरची कारवाई उपविभागिय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सफौ सतिष भताने, पोहेकॉ बबन दहिफळे, पोना/दिपक पवार, पोका सुनिल खैरे, पोकॉ गोकुळ पळसे, पोकॉ राजेंद्र गाडे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों बबन दहिफळे हे करत आहेत.


