कर्जत (प्रतिनिधी) :  रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील विद्यालय टाकळी खंडेश्वरी विद्यालयाचा एस.एस.सी. मार्च २०२४चा निकाल १००% लागला असून २३ विद्यार्थी विशेष प्राविण्य ,१७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून विद्यालयाची विद्यार्थिनी कु. पवार गायत्री विनोद ९१.२०% गुण मिळून प्रथम,कु नांगरे साक्षी संजय ९०.६०% गुण मिळवून द्वितीय तर भिलारे कीर्ती अशोक व पवार अमृता चंद्रकांत यांनी ८९.२०% गुण मिळून तृतीय क्रमांक मिळवला आहे  तसेच देवकर पूजा बापू ८८.४०% गुण मिळून चतुर्थ व हराळ वैष्णवी संभाजी ८८.००% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला आहे.     

                           सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे  आमदार रोहित पवार,  राजेंद्र फाळके, जनरल बॉडी सदस्य,मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राचार्य संजय नगरकर,  स्कूल कमिटी सदस्य श्री.निळकंठ पाटील, किसन ढोबे, श्री बाळासाहेब सपकाळ तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण  पाटील ,गावचे सरपंच अमोल पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन श्री शहाजी पाटील सर्व सोसायटी सदस्य,उत्तर  विभागीय अधिकारी श्री बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे, नाईकवाडी,  विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय दादासाहेब गांगर्डे, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक तथा लाईफ मेंबर प्रशांत खंडागळे आणि विद्यालयातील  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले आहे.