कर्जत (प्रतिनिधी) : फसवणूक करून नेलेला ५५ लाख रुपयांचा ट्रक १४ टायर ट्रक केला जप्त करत तालुक्यातील मिरजगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावसाहेब धोंडीबा सातपुते, (रा. कोकणगाव, ता. कर्जत) यांनी दिलेल्या तक्रारीवरून टाटा कंपनीचा LPT ४२२५ मल्टी अक्सल १४ टायर ट्रक नं. MH १६ CD ५५२९ हा फायनान्स कंपनीकडून ४० लाख रुपये कर्ज घेवून खरेदी केलेला ट्रक सातपुते यांनी आरोपी श्रीकिशन अनुरथ जाधव (रा. आडस ता. केज जि.बीड) याला बंधपत्रावर विक्री केला होता, परंतु आरोपीने फायनान्सचे हफ्ते न भरता ट्रक सातपुते यांच्या संमतीशिवाय परस्पर आरोपी फारुक उल्ला फाईम उल्ला, ( रा. गवलीपुरा, ता. जि. अमरावती) याला विक्री केला होता. व त्याने देखील सातपुते यांची सहमती न घेता ट्रक विकत घेवून फायनान्सचे हफ्ते थकविल्यामुळे सातपुते यांची फसवणूक झाल्यामुळे मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या गुन्ह्यात आरोपींनी साखळी पद्धतीने सातपुते यांचा ट्रक विक्री केल्याचे दिसून आले असून गुन्ह्यातील ट्रक फिर्यादी व पोलीसांपासून लपवून ठेवला होता. तसेच ट्रक कोठे आहे याबाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यावरून गुन्ह्यात ट्रक खरेदी विक्रीचे एजंट सह असे एकूण ७ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. गुन्ह्याच्या तपासात आरोपी- श्रीकिशन अनुरथ जाधव, रा. आडस ता. केज, जि. बीड, फारुक उल्ला फाईम उल्ला, रा. गवलीपुरा, ता. जि. अमरावती यांनी तपासात सहकार्य न केल्याने त्यांना अटक करून गुन्ह्याच्या तपासात आरोपींकडे कौशल्यपूर्वक व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी फारूचे अमरावती येथील इतर साथीदार अस्लम अय्युब खतीब, वय- 36 वर्षे, रा. जमजम कॉलनी, बीड, जि. बीड, सदर अली सुबान अली, वय- 36 वर्षे, रा. भातकुली, ता. भातकुली, जि. अमरावती, अमन खान सरफराज खान, वय- 34 वर्षे, रा. गवलीपुरा, अमरावती, अब्दुल गब्बार अब्दुल खालिक, रा. हैदरपुरा, अमरावती, ख्वाजा फरहानोद्दिन ख्वाजा राऊफोद्दीन, रा. मौलापुरा, अमरावती यांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. तसेच गुन्ह्याच्या तांत्रिक तपासात मिरजगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दारव्हा, ता. दारव्हा, जि. यवतमाळ येथून सातपुते यांच्या मालकीचा ५५ लाख रुपये किंमतीचा एक ट्रक ताब्यात घेतला असून गुन्ह्यातील इतर आरोपींचा मिरजगाव पोलीस शोध घेत आहेत.
सदर कामगिरी ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश विक्रम पाटील, सफौ/अनिल भोसले, पोकों/ सुनिल खैरे, पोकॉ गोकुळ पळसे व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील नेमणूकीचे पोहेकॉ सोहेल मिर्झा व पोहेकॉ/ किशोर झेंडेकर अशांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सफौ/ अनिल भोसले हे करत आहेत.


