कर्जत (प्रतिनिधी) : सुनिल उर्फ बाळू निवृत्ती खरमरे (वय : ५३ वर्षे) यांचे नुकतेच नाशिक येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात तालुक्यातील कोंभळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ, बहीण , पुतणे असा मोठा परिवार आहे. खरमरे यांच्या दुःखद निधनाने शोककळा पसरली आहे.


