कर्जत (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांच्या 59 व्या  वाढदिवसानिमित्त नुकतेच तालुक्यातील खांडवी येथे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले होते. काकासाहेब तापकीर बहुउद्देशीय प्रतिष्ठान व खांडवी ग्रामस्थ यांच्या वतीने या निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कुस्ती मैदानासाठी खांडवी व पंचक्रोशीतून पैलवान व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या मैदानासाठी कर्जत तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील अनेक मल्ल उपस्थित होते. उपस्थित मल्लांनी चांगल्या प्रकारे डाव प्रतिडाव करत उपस्थितांची मने जिंकली.

एक नंबरच्या कुस्तीसाठी दोनही मल्लांनी आपली पूर्ण कसब पणाला लावून प्रेक्षणीय अशी कुस्ती केली, मात्र कुस्ती निकाली होत नसल्यामुळे पंच म्हणून काम पाहणारे राजेंद्र गुंड यांनी गुणांच्या आधारे कुस्तीचा निकाल दिला, या कुस्तीत सुजित करमळ विजयी झाला.


दरम्यान काकासाहेब तापकीर बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने काकासाहेब तापकीर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर व पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी अंबादास पिसाळ, राजेंद्र गुंड, शेखर खरमरे,  बंडा मोढळे, विजय पोटरे, महेश काळे, अण्णा महारणावर, सचिन दरेकर, प्रवीण सुद्रिक व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 हे कुस्ती मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सरपंच प्रवीण तापकीर, शहाजी तापकीर, बंडू तापकीर, प्रकाश पठारे , प्रवीण तापकीर, अभिजीत तापकीर, प्रमोद तापकीर, शहाजी पठारे, तुषार तापकीर, अमृत तापकीर, दादा उल्हारे, अशोक तापकीर वैभव तापकीर, दीपक एकाड, सतीश भालसिंग यांनी अथक परिश्रम घेतले.

आभार व्यक्त करताना सरपंच प्रवीण तापकीर यांनी पुढील वर्षी  यापेक्षा मोठे मैदान घेण्याचा मानस व्यक्त करत उपस्थित मान्यवरांचे, प्रतिष्ठानचे सभासदांचे तसेच ग्रामस्थांचे आभार मानले.