कर्जत (प्रतिनिधी) : जामखेड येथील संताजी नगर भागात राहणारे विठ्ठल मारुती खैरे यांची श्रीगोंदा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील खुनाचा प्रयत्न करणे आरोपातील केसमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे फिर्यादी हे गजानन वेल्डिंग दुकानांमध्ये काम करत असताना त्यांना त्यांची पत्नी हिने फोन केला व सांगितले की वडील प्रकाश शिंदे हे जामखेड गावातून संताजी नगर येथे जात असताना आरोपी विठ्ठल मारुती खैरे हा त्याचे त्याच्या घरासमोर असताना वडील त्यास म्हणाले की तू गल्लीत अंडर पॅन्ट वर का फिरतो तसेच कुठेही लघवी का करतोस असे विचारल्याचा राग आल्याने आरोपी खैरे याने फिर्यादीचे सासरे प्रकाश शिंदे यांना वाईट शिव्या देऊन थांब तुझा बेतच पाहतो असा दम देऊन आरोपीने कोयत्याने शिंदे यांच्या मानेवर, डाव्या हातावर, उजव्या हातावर, कोयत्याने मारून गंभीर दुखापत केली आहे, नंतर फिर्यादी घटना ठिकाणी गेले असता त्यांचे सासरे त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते त्यानंतर फिर्यादी यांनी सासरे प्रकाश शिंदे यांना दवाखान्यात उपचार करण्यासाठी नेले, त्यानंतर सदर घटनेबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 सदर फिर्यादीप्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र सादर होऊन सदरची केस न्यायालयात चालली परंतु सदर केस मध्ये फिर्यादी पक्षाने सदरची केस सिद्ध करू न शकल्याने व सदर केस मध्ये पुराव्या अभावी आरोपी विठ्ठल मारुती खैरे यांची निर्देश मुक्तता करण्यात आली आहे. यादरम्यान आरोपीच्या वतीने अँड भाऊसाहेब पांडुरंग क्षिरसागर यांनी काम पाहिले.