कर्जत (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र मांदळी येथील ओम चैतन्य ब्रम्हरूपविदेही मठाधिपती आत्मारामगिरी बाबा यांचा प्रकट दिन सोहळा गुरुवार (दि. ०४ जुलै ) रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्री लालगीर बुवा मठ ट्रस्ट मांदळी यांच्या वतीने देण्यात आली आहे.
आत्मारामगिरी बाबा यांच्या प्रकट दिन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सकाळी ७ ते ९ वाजेच्या दरम्यान रथ मिरवणूक प्रदक्षिणा , ९ ते १० वाजेच्या दरम्यान पुजा विधी , त्यानंतर ११ ते 1 ते वाजेपर्यंत हभप अभिजित महाराज गिरी संगमनेर यांचे हरिकीर्तन होणार आहे, दु 1 नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या पुण्यसोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री लालगीर बुवा मठ ट्रस्ट मांदळी व ट्रस्ट च्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


