कर्जत एमआयडीसी च्या रूपरेखा सर्वेक्षणास सुरुवात.

आ राम शिंदेच्या पाठपुराव्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार.

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील कोंभळी ,खांडवी , रवळगाव व थेरगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या जागचे रूपरेखा सर्वेक्षण आज (दि.०३ जुलै) रोजी सुरु झाले आहे. मुंबई येथे सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यान आ राम शिंदे कोंभळी परिसरातील एमआयडीसी साठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला , त्यामुळे आता या भागात एमआयडीसी होण्याचा मार्ग मोकळा झाला असून रूपरेखा सर्वेक्षण झाल्यानंतर प्रस्तावित जागेचा भूसंपादनाचा देखील मार्ग मोकळा होणार आहे.


आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास एमआयडीसीचे पथक दाखल झाले होते, यावेळी कोंभळी ,खांडवी, रवळगाव व थेरगाव परिसरातील नागरिकांनी पथकाचे वाजत गाजत स्वागत केले, अवर्षणप्रवण भागात एमआयडीसी होत असल्याने येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी दिसून आले. औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाने प्रस्तावित जागेचे रूपरेखा सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली असून या पथकात एमआयडीसीचे प्रमुख भूमापक एस डी खैर , भूमापक एस के राठोड, तसेच एमआयडीसीने निनाळे इंजिनिअर्स या कंपनीला रूपरेखा सर्वेक्षणाचे काम दिले असून त्या कंपनीचे भूमापक वासुदेव गावडे हे देखील कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह प्रस्तावित जागेवर हजर झाले आहेत, रूपरेखा सर्वेक्षण होण्यासाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतर अंतिम झालेल्या जागेचे भूसंपादन होणार आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर , कर्जत भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल यादव, संचालक कुंडलिक गांगर्डे, उपसरपंच मारुती उदमले, थेरगावचे सरपंच मिनिनाथ शिंदे, मोहन खेडकर, आण्णा महारणवर,सोशल मिडिया तालुका प्रमुख काकासाहेब पिसाळ, सुनिल खंडागळे, अमोल गांगर्डे, भाऊसाहेब गांगर्डे, चंद्रकांत महारणवर, विठ्ठल ननवरे , रामा शिंदे, देविदास महारणवर, भाऊसाहेब गावडे, वैभव गांगर्डे आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.


कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेचे रूपरेखा सर्वेक्षण झाल्यानंतर डोंगर, चढउतार याची माहिती मिळणार असून त्यानुसार नियोजन विभाग कोणती जागा चांगली आहे हे ठरवणार आहे, यादरम्यान ४८१.९८ हेक्टर क्षेत्राचे रूपरेखा सर्वेक्षण होणार असून सर्वेक्षणासाठी आठ दिवसाचा कालावधी लागणार असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तीन चार दिवसात याचा अहवाल येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे भूमापक एस के राठोड यांनी यावेळी दिली.



परिसरात प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या जागेचे रूपरेखा सर्वेक्षण चालू झाले आहे , मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी रोहित पवार हे आमच्या भागात येऊन हि एमआयडीसी होऊ देणार नाही, कोर्टात जाऊन एमआयडीसी न होण्यासाठी स्थगिती आणणार असल्याचे म्हणत आहेत, त्यामुळे त्यांना आमदार करून आता आम्हाला पश्चाताप होत आहे, अवर्षण प्रवण भागात एमआयडीसी होत असल्याचे या भागातील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे, आ राम शिंदे साहेबांनी मोठा पाठपुरवा करून आमच्या भागाला न्याय देण्याचे काम केले आहे , मात्र लोकप्रतिनिधी त्याला विरोध करून स्थगिती आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत , याचे जनता त्यांना विधानसभेला चोख उत्तर देईल.

- काकासाहेब तापकीर, सभापती, बाजार समिती कर्जत.



आ राम शिंदे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा ठेवल्यामुळे विक्रमी वेळामध्ये या कर्जत एमआयडीसीला तत्वतः मिळाली आहे, त्यामुळे प्रकरण ६, कलम २ खंड (ग) प्रमाणे पुढील कार्यवाही आदेशित झाली आहे त्यानुसार आता रुपरेखा (कंटूर )सर्वेक्षण झाल्यानंतर भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे येथील युवकांच्या, स्थानिक रोजगार उपलब्ध होण्याच्या आशा आकांक्षा पल्लवित झालेल्या आहेत, अवर्षण प्रवण भागात एमआयडीसी येण, आमचा भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येण यामुळे आमच्या पिढ्यांचा कायापालट होणार आहे हा जागरूक लोकप्रतिनिधी आ . राम शिंदे यांनी या भागावर खऱ्या अर्थान केलेला उपकार आहे, आ रोहित पवार हे सभागृहाच्या बाहेर लोकांची दिशाभूल करत असून या ठिकाणी वन विभागाची जमीन असल्याचे एमआयडीसी होणार नसल्याचे सांगत आहेत, ते लोक प्रतिनिधी आहेत ते सांगत असलेले सत्य असेल तर सभागृहात त्यांनी आवाज उठवावा परंतु ते न करता खोटी माहिती सागून लोकांची दिशाभूल करत आहेत . अवर्षण प्रवण भागातील कायापालट करण्याची क्षमता असलेल्या या योजनेचा अक्षरशः तोंडचा घास हिरावून घेण्याचे काम करत आहेत. सभागृहात लोकांचे प्रश्न मांडायचे असतात हे आ रोहित पवार विसरून गेले आहेत, गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी ते राबत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून गुंतवणूकदारांचीच एमआयडीसीची जागा जावी यासाठी ते आग्रही आहेत. उच्य स्तरीय समितीने १५ मार्चला कर्जत एमआयडीसी साठी तत्वता मान्यता दिली आहे मग आता रोहित पवार कर्जत तालुक्यात कुठली एमआयडीसी मागत आहेत? धादांत खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत . लोकांनी तुम्हाला या भागाचे प्रतिनिधि केले मग आता खरचं प्रश्न पडतो कि तुम्ही आमचे प्रतिनिधित्व करता का? तुमच्या कृतीतून ते जाणवत नाही . तुमच्या हट्टापायी तुम्हाला वाटेल तोच विकास हिच सरंजाम शाही वृत्ती आमच्या अवर्षण प्रवण भागाला मारक ठरणार आहे . तुम्ही आम्हाला विकासा पासून वंचित ठेवायला निघाला आहात का ? असा सवाल लोकांमधून उपस्थित होत आहे.

- शेखर खरमरे, तालुकाध्यक्ष, भाजप कर्जत.