कर्जत (प्रतिनिधी) : येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रतिक सुरेश तोरडमल याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे, तर अमीर ताजुलमुल्क आतार व आनंद भाऊसाहेब खुळे हे दोघे राज्य राखीव पोलिस बल दौंड येथे भरती झाले आहेत.

त्याचबरोबर आदित्य प्रकाश गिरी हा महाराष्ट्र पोलीस मध्ये बीड येथे भरती झाला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा  संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत, सचिव वैभव छाजेड, संस्था निरिक्षिका उषा राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्योजक विजय नेटके, सतिश व्यवहारे, विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. राहुल भापकर यांनी केले, तर आभार  प्रा. नवनाथ गुंजाळ यांनी मानले.