कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यातील मांदळी चे ग्रामपंचायत सदस्य सुधीर बचाटे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत खासदार निलेश लंके व आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना फळ रोपांचे वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.
दरम्यान मांदळी येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केशर आंबा रोपांचे वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडी येथे लहान मुलांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला
यावेळी सरपंच भगवान गांगर्डे, मा. सरपंच हौसराव गांगर्डे, मा.सरपंच बलराम बचाटे , मा. सरपंच मोहन गारूडकर, तंटा मुक्त अध्यक्ष निवृत्ती गांगर्डे, ट्रस्ट सचिव बंडु गांगर्डे, ग्रा. प.सदस्य किरण गारुडकर, वाळके, लालासाहेब गांगर्डे, गौतम बचाटे, अंबादास बचाटे, बबन गांगर्डे, म्हसू बचाटे, शालेय समिती अध्यक्ष श्रीराम गांगर्डे, ठेकेदार स्वप्नील शहाणे, रामदास गांगर्डे, नारायण भुजबळ, शिवाजी पाटील, धनु भुजबळ, संदीप गांगर्डे, पप्पू बचाटे, अक्षय बचाटे, संजय क्षिरसागर, नितीन सोनवणे , शिक्षक आत्माराम सटाले , नवनाथ थोरात, गणेश टेकाळे उपस्थित होते.


