कर्जत (प्रतिनिधी) : कार्विंग स्टुडिओच्या माध्यमातून ढवळे बंधूंनी व्यवसायात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केले आहे असे प्रतिपादन कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केले.

ते कर्जत शहरात कार्विंग स्टुडिओच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष गणेश क्षिरसागर, युवा नेते शरद म्हस्के, मा नगरसेवक अनिल गदादे, आर्किटेक्ट संजय जाधव, पत्रकार गणेश जेवरे, उद्योजक अक्षय राऊत, बाळासाहेब गुंड आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कार्विंग स्टुडिओच्या माध्यमातून विनायक ढवळे, जाकीर शेख, मंगेश ढवळे यांनी एलईडी बोर्ड, बंगल्यावरील अक्षरे, नेम प्लेट, एमडीएफ, अँक्रँलीक, एसीपी, डब्लूपीसी, प्लाय, वूडन जाळी, मंदिर जाळी कटिंग, थ्री डी कार्विंग, रेडियम वर्क, डिझायनिंग, फ्लेक्स प्रिंटिंग, व्हीनायल प्रिंटिंग, फोटो फ्रेमिंग अश्या प्रकारची अनेक कामे केली आहेत.

दरम्यान कार्विंग स्टुडिओच्या वर्धापनदिन कार्यक्रमात सुत्रसंचालन निवेदक मनमोहनदास खुडे यांनी सूत्रसंचालन केले, शरद म्हस्के, आर्किटेक्ट संजय जाधव, पत्रकार गणेश जेवरे, उद्योजक शरद तनपुरे  यांनी आपली मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. पत्रकार अस्लम पठाण यांनी प्रास्ताविक केले. वायजी इन्फोटेक चे योगेश गांगर्डे यांनी आभार मानले. यावेळी एटीआर इव्हेंटो चे शाहबाज आतार, अंबादास वीर , कारागीर बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथम वर्धापनदिनानिमित्त कार्विंग स्टुडिओचे व्यवस्थापक विनायक ढवळे, जाकीर शेख, मंगेश ढवळे यांना विविध मान्यवरांनी कर्जत शहराच्या शहरीकरणात व्यवसायाच्या माध्यमातून योगदान दिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.