कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोंभळी परिसरात आजतागायत पावसाचे प्रमाण कमी आहे, थोडयाफार पावसाने पिके तग धरून आहेत, कोंभळी येथील पाझर तलावात पाणी न आल्याने तलावाखाली असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला पाहिजे तसे पाणी न आल्याने गावात काही ठिकाणी पाण्याची कमतरता भासत आहे.

गावातील नागरिकांना असलेली पाण्याची गरज ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे युवा नेते रुपचंद गांगर्डे यांनी गावातील नागरिकांना स्वखर्चातून टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाणीपुरवठा टँकरचा शुभारंभ आज भैरवनाथ मंदिरासमोर गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी चेअरमन मारुती गांगर्डे, रामचंद्र गांगर्डे, रंगनाथ गांगर्डे, व्हॉइस चेअरमन गोरख गांगर्डे, संतराम गांगर्डे, युवा नेते अमोल गांगर्डे, माजी सरपंच सीताराम गांगर्डे, बबन गांगर्डे, संतराम माकुडे, प्रताप गांगर्डे, दिपक साळुंके, संतोष गांगर्डे आदींसह नागरिक उपस्थित होते.

रुपचंद गांगर्डे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात, ते न्यू इंग्लिश स्कुल ला दररोज पाच फिल्टर पाण्याचे जार देत आहेत. तसेच शाळेसाठी स्टेज दिले आहे.

ज्या लोकांना पाण्याची अडचण आहे त्या सर्व लोकांना मोफतपाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच कोणाच्या घरी लग्नसमारंभ,वास्तूशांती,जागरण गोंधळ किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात देखील नैसर्गिक आपत्ती ने पाण्याची गरज भासल्यास गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुपचंद गांगर्डे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.