मी कोणत्याही पक्षाचा राजकीय व्यक्ती नाही पण ज्या ज्या वेळी आपल्या भागाचा, तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा प्रश्न येइल तेव्हा मी  जे सत्य आहे तेच अधोरेखीत करत राहील मग त्यावेळी राजकिय पक्षांपेक्षा अगोदर कर्मभूमी, मातृभूमीला प्राधान्य असेल... पक्ष.. राजकारण हा विषय सोडून एक भूमिपुत्र म्हणून स्पष्ट मत मांडत आहे... खाली दिलेल्या माहितीनुसार हे तर स्पष्ट दिसत आहे की एमआयडीसी मंजुर झालेल्या भागात कोणताही भरीव विकास आजपर्यंत तरी करता आलेला नाही...ना मोठे शहर जवळ.. ना रस्ता रुंदिकरण,ना मोठे पक्के रस्ते झाले त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न उधभवलेला... ना एकही मोठा पाण्याचा स्त्रोत म्हणजेच ना धरण, ना कुकडी, ना कालवा, ना उपसासिंचन म्हणजेच पाण्याचाही गंभीर प्रश्न !. कित्येक लोकांनी राजकारणाच्या तोंडावर, इथे उपसासिंचन करून शेती, पिण्याचे पाणी यांचा प्रश्न कायमचा मिटवू अस भर सभेत सांगितल .. झालेत का हे कामे? मग पाण्याचा स्रोत कसा असणार इथे ?..ना आसपास शिक्षणसंस्था, ना कारखाने,ना इंडस्ट्री.. ना प्रसिध्द धार्मिक स्थळे मग रेल्वे किंवा रेल्वे स्टेशन होणार कशाला? 

मग रस्ता, पाणी याचा विकास होणार तरी कसा?.. जर या भागाचा विकास करायचा असेल तर आशा गोष्टी इथे होण गरजेच आहेच ... मान्य आहे की ही जागा तालुक्याच्या कोपऱ्यात आहे पण हा तालुक्याचाच भाग आहे ना?... तालुक्याचा कोपऱ्यात आहे म्हणूनच दुर्लक्षित राहिली आहे आजपर्यंत अशी खेडे ,असे तालुक्याच्या कोपऱ्यात येणारे शेकडो गावे असतील मग ते विकासापासून वंचित राहणार का ?अन् अजूनही असाच विचार झाला तर आशा भागाचा विकास होणार तरी कधी? झालीय एमआयडीसी मंजुर या भागात हे ऐकायला येतंय पणं माहीत नाही की याचेही सूतगिरणी..तुकाई चारी किंवा उपसाजलसिंचन प्रमाणेच परिस्थिती होतीय कि राजकारणापर्यंत  मर्यादित राहत आहे? कारण इथूनमागे भेटलेले आश्वासने माञ इलेक्शन होईपर्यंतच चर्चेत राहिली ती पूर्णत्वास तर नाही आली अन्यथा हा भाग आज बारमाही जलमय असता, रस्ते विकास झाला असता, माझा कोणालाही विरोध नाही पण असा विचार जर केला तर मग हया भागांची अवस्था कधीही बदलणार नाही हे त्रिकाल सत्य आहे .. जर या भागात कोणताच विकास झालेला नाही हे खाली दिलेल्या माहितीवरून सिद्ध होत असेल तर मग खरच हा भाग कर्जत जामखेड मतदार संघातील आहे का हा प्रश्न निर्माण होतो? कारण सगळी कडे म्हटंल जातंय की कर्जत जामखेडचा विकास होत आहे.. मग ही परिस्थिती इथे का?


- प्रा एन एस तापकीर