कर्जत (प्रतिनिधी) : खांडवी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष , प्रगतशील शेतकरी कुंडलिक निवृत्ती तापकीर (वय : यांचे बुधवारी (दि. 04 सप्टेंबर) दुःखद निधन झाले आहे.
कुंडलिक तापकीर हे नाना नावाने सर्वपरिचित होते, त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी, मुले, मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
आज खांडवी येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. खांडवी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव विठ्ठल तापकीर यांचे ते वडील होत.


