कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यातील उडीद उत्पादक शेतकर्‍यांनी कर्जत बाजार समिती व उपबाजार मिराजगाव, राशीन येथील अधिकृत आडते व्यापारी यांनाच उडदाची विक्री करावी. हिशेब पट्टी व तोलाई पावत्या घ्याव्यात, असे आवाहन कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी केले आहे.

चालू वर्षीच्या खरीप हंगामाती उडिद पिकाची मोठयाप्रमाणात आवक बाजार समितीमध्ये होत असुन कृषि उत्पन्न बाजार समिती कर्जत व उपबाजार मिरजगांव व राशीन येथे चांगले उच्चतम भावात परवानाधारक आडत्या खरेदीदार यांचेकडून खरेदी होत आहे. मात्र काही खाजगी व्यापारी हे कमी भावात अनाधिकृत पणे कार्यक्षेत्रात खरेदी करत असल्याचे बाजार समितीचे निर्देशास तसेच तक्रारी येत असल्याने शेतक-यांनी त्यांचा उडिद हा शेतमाल कर्जत किंवा मिरजगांव राशिन उपबाजार येथे विक्रीसाठी आणावा तसेच याबाबत परवानाधारक आडते/व्यापारी यांचेकडून विक्रीची अधिकृत बाजार समितीकडून प्रमाणित केलेली हिशोब पट्टी व तोलाई पावती घेण्यात यावी तसेच अनाधिकृत व्यापारी कमी भावाने उडिद खरेदी करत असल्याचे निर्दशनास आल्यास त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल असे अवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकिर व सर्वसंचालक, सचिव यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

तसेच शनिवारी बाजार समितीच्या मुख्यालयात आडते/व्यापारी, हमाल मापाडी यांचे बरोबर मिटींग लावून सर्व व्यापारी यांना शेतक-यांकडून आद्रता तपासणीमध्ये तफावत होत असल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहे, त्या अनुषंगाने सभापती तापकीर यांनी सर्व आडते व्यापारी यांचे आद्रता मशिन शासनाचे संबंधित अधिकृत विभागाकडून वजनकाटा व आद्रता मशिनची तपासणी बाबतच्या सुचना दिल्या. तसेच शेतमालाच्या मॉईश्चरची तपासणी करतांना नमुना म्हणून फक्त १५० ग्रॅमच माल घेण्याबाबाबतही सुचनाकरण्यात आल्या. शेतक-यांनीही शेतमाल आणतांना त्यामध्ये माती, काडी, खडे यांचे प्रमाण कमी राहील याची दक्षता घ्यावी असे आवाहन यावेळी सभापती काकासाहेब तापकीर यांनी केले आहे.