कर्जत (प्रतिनिधी) : आज कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाला कधी नव्हे ते दोन-दोन आमदार मिळाले परंतु कर्जत तालुक्याचा विकास दुपटीने होण्यापेक्षा तो खुंटला आहे असेच म्हणण्याची वेळ आज कर्जतकरांवर आली असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बळीराम यादव यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हंटले आहे की, त्याला कारणही तसेच आहेत. पाटेगाव परिसरातील झिंजेवाडी येथील मारुती झिंजे व त्यांच्यासोबत च्या महिलांना तेथीलच काही समाजकंटक महारणावर व इरकर कुटुंबाकडून जबर मारहाण करण्यात आली त्यामध्ये मारुती झिंजे यांच्या दोन बरगड्या तुटल्या असून मनकाही फ्रॅक्चर झालेला आहे तसेच सोबतच्या महिलांना मारहाण करून विनयभंग करण्याचा प्रकार घडलेला असताना मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पाटील साहेब यांनी किरकोळ स्वरूपाचा गुन्हा नोंदउन सदरील व्यक्तींना न्याय द्यायचा सोडून ज्यांनी झींजे कुटुंबाला मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून उलट आरोपींना मॅनेज होऊन उलट झिंजे कुटुंबावरच गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अन्यायाच केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्यांना फोनवरून जाब विचारल्यानंतर त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. तसेच अन्याय झालेल्या व्यक्तींना न्याय द्यायचा सोडुन अर्थिक मॅनेज होऊन दोन्ही आशिलांच्या केसेस नोंदवून घेण्यावर सदरील अधिकाऱ्याचा कायमच भर असल्याचे वेळोवळी निदर्शनास आले आहे.यावरूनच दोन्ही आमदारांचा प्रशासनावर कुठलाही वचक राहिलेला नाही हे दिसतआहे .गेल्या काही दिवसात दोन्ही आमदार कर्जत तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःच गुणगान गाण्यात मशगुल आहेत व कर्जतची अवस्था आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय अशीच काहीशी झालेली आहे.कर्जत तालुक्यामध्ये आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व कामे निकृष्ट पद्धतीने चालू आहेत. कर्जत पंचायत समितीत मध्ये पंचायत समितीतील अधिकारी म्हणजे दलालांचा अड्डा झालेला आहे तसेच भूमिलेख विभाग खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटला गेला आहे .
अशा परिस्थितीत कर्जत मधील जनतेला दोन्ही आमदाराकडून कुठलेही सहकार्य मिळताना दिसत नाही. याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख तसेच बाजार समितीचे संचालक बळीराम यादव यांनी स्पष्ट भूमिका घेत कर्जत तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर न सोडता कुठल्याही प्रकारची गरज लागल्यास कर्जत तालुक्यातील शिवसेना ही सर्वसामान्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील व यामध्ये प्रशासनाचे सहकार्य न लाभाल्यास प्रशासनाला शिवसेना स्टाईलने सरळ करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पाटील हे नेमके कुठल्या आमदाराच्या आशीर्वादाने सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत आहेत हे ही स्पष्ट होणे गरजेचे आहे तसेच सदरील मारुती झिंजे या व्यक्तीस न्याय न मिळाल्यास मिरजगाव पोलीस ठाणे येथे शिवसेना स्टाईलने आंदोलन करून पोलीस अधिकारी पाटील यांना वाठणीवर आणण्याचे काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. तसेच सदरील अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी बळीराम यादव यांनी केली आहे.
तसेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास कर्जत तालुका शिवसेनेशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी तालुकाप्रमुख बळीराम यादव यांनी पत्रकद्वारे केले आहे.


