कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोंभळी बसस्थानाकावरील खांबाला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे, त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे केलेले विजेचे खांब धोकादायक बनत चालले आहेत.

रात्री अज्ञात वाहनाने कोंभळी बसस्थानाकाजवळील रस्त्याच्या कडेने उभ्या केलेल्या विजेच्या खांबाला धडक दिल्याने खांब वाकला असून सदर विजेचे खांब इतरत्र हलवण्याची वा काढून टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.