कर्जत (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा अखिल वारकरी सेवा मंडळ मला खूप मोठा आधार दिला, मला हा ग्रुप स्ट्रॉंग आणि सुधारित सापडला आहे,  त्यामुळे त्या ठिकाणी कुठलेही काम करताना कुचराई होणार नाही, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात आपले दहा लोक झाले तरी आपल्याला कोणत्याही जिल्ह्यातील चिंचा राहणार नाही आणि हे काम आपण सर्वांनी एकजुटीने करावे, असे प्रतिपादन अखिल वारकरी सेवा मंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हभप बलभीम महाराज पठारे यांनी केले. कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र मांदळी येथे अखिल वारकरी सेवा मंडळाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या त्यावेळी बोलत होते. 


अखिल वारकरी सेवा मंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हभप बलभीम महाराज पठारे , अखिल वारकरी सेवा मंडळाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हभप सोमनाथ महाराज गांगर्डे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष पदी पंडित हरगुडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी बाळासाहेब हरगुडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी सखाराम हरगुडे, उप कार्याध्यक्ष पदी चंद्रकांत गळंगे यांची नियुक्ती करण्यात आली.


यावेळी लालगिर स्वामी ट्रस्टचे अध्यक्ष धनेश गांगर्डे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता फलके, उपाध्यक्ष तुकाराम फलके, कार्याध्यक्ष गोरख महाराज गायकवाड, बीड जिल्हा कार्याध्यक्ष चेअरमन हनुमंत परकाळे, बीड जिल्हा उपाध्यक्ष हारकर सर , कर्जत तालुकाध्यक्ष छगन महाराज गांगर्डे, लालगिर स्वामी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी गांगर्डे, महाराष्ट्र राज्य विश्वस्त अजिनाथ महाराज नवले, ट्रस्टचे सचिव राजेंद्र, स्थानिक अध्यक्ष मांदळी श्रीधर गांगर्डे, सदस्य छबुराव भुजबळ आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.