कर्जत (प्रतिनिधी) : नगर सोलापूर महामार्गावर आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला, तालुक्यातील माहिजळगाव बायपास जवळ हा अपघात झाला, मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन दोन युवक ठार झाले आहेत.

माहिजळगाव बायपास जवळ मालवाहतूक ट्रक सोलापूरच्या दिशेने जात असताना दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने आल्याने धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातात कोकरवाडी (ता परांडा) येथील सोमनाथ दत्तात्रय कदम (वय 24 वर्षे) हा युवक जागेवरच ठार झाला तर शिवाजी बबन कदम (वय 35 वर्षे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना लहू बावडकर यांच्या जीवणज्योत अंबुलन्स ने मिरजगाव येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते.