कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज अर्ज छाननी दरम्यान 23 उमेदवारांचे 33 अर्ज पात्र ठरले होते, त्यानंतर आज अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
कर्जत तालुक्यातील सुपे येथील रोहित सुरेश पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र अर्ज करण्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आ रोहित पवार व आ राम शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या प्रत्येकी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आ रोहित पवार यांच्याकडून या पवारांची मनधरणी झाली काय ? मनधरणी होऊन अर्ज माघारी घेतला काय अश्या चर्चा तालुक्यात सुरू आहेत.


