कर्जत (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अरुण पवार यांचा सेवापूर्ती कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला . सुरुवातीलाच कार्यक्रमाचे अध्यक्ष नागवडे कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री राजेंद्र दादा नागवडे व व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांच्या हस्ते कर्मवीर अण्णा व सौ वहिनींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. तदनंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
याप्रसंगी विद्यालयातील साई आवारे व प्रज्ञा उंडे या विद्यार्थ्यांनी पवार सरांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर
,भगवान दिघे यांनी आपल्या बहारदार भाषणातून पवार सरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला
सरांचा माजी विद्यार्थी पीएसआय आप्पासाहेब हंडाळ यांनी ' माझे गुरु माझ्या जीवनाचे प्रेरणास्थान बनले असे उदगार काढले. याप्रसंगी नरसिंह पवार भाऊसाहेब बांदल, थोर देणगीदार स्थानिक स्कूल कमिटी सदस्य भाऊसाहेब महाडिक, सुहासिनी पवार नागवडे कारखान्याचे विद्यमान संचालक सुभाष काका शिंदे , स्मितल भैया वाबळे, संतोष राव गुंड, घनश्याम अण्णा शेलार इत्यादी मान्यवरांनी सरांनी दिलेल्या शिक्षण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील योगदान विषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात आदरणीय राजेंद्र दादा नागवडे यांनी ' आपण काय करणार आहोत यावर नव्हे तर आपण काय केले आहे यावर समाज आपले मूल्यमापन करतो असे प्रतिपादन केले. अरुण पवार सर यांची मुलगी नंदिनी हिने गीताच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करताना मान्यवरांचे डोळे पाणावले.सर्व सेवकांच्या वतीने अरुण पवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती अरुण पवार आपले विचार मांडताना म्हणाले मी माझ्या 32 वर्षाच्या सेवेत अखंडपणे ज्ञान दानाचे कार्य केले यापुढेही मी सामाजिक कार्यात योगदान देत राहीन . रयत शिक्षण संस्थेने अरुण पवार सर यांच्या कामाची दखल घेत त्यांना अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी याठिकाणी पुढील दोन महिन्यासाठी मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली.तसेच या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल वैभव काळूखे ,प्रणव नलगे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य विजयराव उंडे , सरपंच प्रमोद शिंदे यांच्या हस्ते सन्मान तसेच एन एम एम एस गुणवत्ता यादीतील विद्यार्थी उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्य स्मितल भैया वाबळे यांच्या वतीने रायटिंग बोर्ड प्रत्येक विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात आले. रयत सेवक को-ऑ.बँकेचे विद्यमान संचालक दिलीपराव तुपे , प्रशांत खामकर, जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे यांच्या हस्ते रयत बँकेच्या वतीने चांदीचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान दिघे ,अर्चना कोरडे यांनी केले . या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त अरुण पवार सरांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थी सेवक ग्रामस्थ व पंचक्रोशीतील उपस्थित मान्यवर या सर्वांना स्वादिष्ट असे स्नेह भोजन दिले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.