कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या खांडवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. उपसरपंच छाया माणिक पठारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त झाले होते, उपसरपंच पदासाठी सरपंच प्रविण तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसरपंच पद निवडीच्या कार्यक्रमात संजय रामचंद्र कांबळे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे छाननी नंतर त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर कांबळे यांचा उपस्थितांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब तापकीर ,रुपाली उल्हारे, छाया पठारे,वैशाली तापकीर,उषा रणपिसे,संजय कांबळे, व सरपंच प्रविण तापकीर उपस्थित होते त्यांच्या निवडीनंतर उपसरपंच संजय कांबळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पोपट कांबळे,प्रदीप तापकीर,विलास कांबळे, प्रकाश पठारे, अभिजित तापकीर, राजेंद्र तापकीर, वसंत तापकीर, रामदास तापकीर, नवनाथ तापकीर, शहाजी पठारे, नानासाहेब तापकीर, बबन कांबळे, संतोष तापकीर, सुनील खंडागळे, बाजीराव पवार, दादा उल्हारे, व महादेव तापकीर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते