कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील कोंभळी येथील पत्रकार योगेश गांगर्डे यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गांगर्डे यांची पाईपलाईन फोडून नुकसान करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कोंभळी येथे सुभाष गांगर्डे व विठ्ठल गांगर्डे यांची सामायिक विहीर आहे. दोघेही त्या विहिरीतून पिकासाठी पाणी उपसा करतात, मात्र काही कारण नसताना विठ्ठल गांगर्डे, संतोष गांगर्डे यांनी पत्रकार योगेश गांगर्डे यांचे वडील सुभाष गांगर्डे यांची पाईपलाईन फोडून नुकसान करून केले. वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकारामुळे गांगर्डे कुटुंबीय भयभीत झाले आहे. सुभाष गांगर्डे यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार भोसले हे करत आहेत.