कर्जत (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, कोंभळी विद्यालयात भारतभरातील कर्तृत्व संपन्न थोर महिलांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, विद्यार्थ्यांचे वक्तृत्व कौशल्य विकसित व्हावे आणि माता पालकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग सचिव सुनील गोरखे व माता पालक संघाच्या सचिव सुनंदा कांबळे यांच्या वतीने सोमवार दि. 22 सप्टेंबर ते बुधवार दि 01 ऑक्टोबर या कालावधीत"नवदुर्गा विद्यार्थिनी व्याख्यानमाला आणि नारीशक्ती सन्मान नवरात्र सोहळा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विद्यालयाच्या नियोजनानुसार खालील प्रमाणे विद्यार्थिनी श्रेष्ठतम महिला व्यक्तिमत्वन विषयी व्याख्यान देणार आहेत, त्याच दिवशी व्याख्यात्या विद्यार्थिनीच्या मातेचा भाषणानंतर खण,नारळ, शाल आणि स्नेहवस्त्र देऊन ओटी भरून सन्मान केला जाणार आहे.
नवरात्र वाग्यज्ञ सोहळा नियोजन
22 सप्टेंबर
कु.आत्मजा महेंद्र गांगर्डे (इयत्ता दहावी)
राजमाता जिजाऊ माँ साहेब
23 सप्टेंबर
कु.वैष्णवी दीपक जगधने(इयत्ता दहावी)
झाशीची राणी लक्ष्मीबाई
24 सप्टेंबर
कु. प्रांजल दिगंबर गांगर्डे (इयत्ता नववी)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
25 सप्टेंबर
कु. तनुजा चंद्रशेखर काकडे(इयत्ता नववी)
फातिमा शेख
26 सप्टेंबर
कु. आरती रावसाहेब गांगर्डे(इयत्ता आठवी)
रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील
27 सप्टेंबर
वैष्णवी गोरखे (इयत्ता आठवी)
सिंधुताई सपकाळ
29 सप्टेंबर
कु. सृष्टी निलेश शेलार(इयत्ता सातवी)
रमाबाई आंबेडकर
30 सप्टेंबर
कु. ज्ञानेश्वरी अनिल गांगर्डे(इयत्ता सहावी)
आनंदीबाई जोशी
01ऑक्टोबर
कु. स्वरा रवींद्र गांगर्डे(इयत्ता पाचवी)
मेधा पाटकर
आज 22 सप्टेंबर रोजी आत्मजा महेंद्र गांगर्डे या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्या प्रभावी व्याख्यानातून सर्वांना करून दिला आणि त्यानंतर विद्यार्थीच्या माता पालक अश्विनी महेंद्र गांगर्डे यांचा स्नेहपूर्वक सन्मान ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कांबळे व भाग्यश्री गाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. विद्यालयात मातांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी आपल्या मनोगता मधून कौतुक केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन आयोजन करण्यासाठी गुरुकुल विभाग सचिव चांगदेव जायभाय, योगेश डमाळे, उमेश आखाडे, गंगाराम उंबरे, संजय राठोड, निखिल काशीद, गणेश खंडागळे, कैलास ढोबे, अनिस शेख, राजेंद्र खिल्लारे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने कर्तृत्व संपन्न महिलांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देऊन वाकचातुर्य असणाऱ्या मुलींच्या मातांचा यथोचित सन्मान करणाऱ्या विद्यालयाच्या या उपक्रमाचे कोंभळी, खांडवी, कौडाने, रोटेवाडी, गावडेवाडी व रवळगाव येथील सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी विद्यालयाच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले.