कर्जत : ​भारतीय जनता पार्टीचे एक कणखर आणि निर्भीड नेतृत्व, पक्षाच्या विचारधारेला सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजवणारे उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व, शेखर नाना खरमरे यांचा आज वाढदिवस. त्यांचा हा विशेष दिवस, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे स्मरण करण्याचा आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्याचा आहे.

​शेखर नाना खरमरे हे भारतीय जनता पार्टीसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि विश्वसनीय नाव आहे. त्यांच्या खांद्यावर सध्या भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर दक्षिण जिल्हा संघटन सरचिटणीस या पदाची आणि कर्जत जामखेड प्रभारी या जबाबदारीची धुरा आहे. यापूर्वी, त्यांनी कोंभळी गावचे माजी सरपंच आणि कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष म्हणूनही यशस्वीपणे काम पाहिले आहे. त्यांची ही वाटचाल त्यांची संघटनात्मक पकड आणि नेतृत्वाची क्षमता सिद्ध करते.

​शेखर नाना खरमरे यांची ओळख विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांचे कट्टर खंदे समर्थक म्हणून आहे. भाजपच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. त्यांची ही अतूट बांधिलकी आणि निष्ठा भाजपच्या विचारधारेला बळ देणारी ठरली आहे.

​खरमरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा विशेष म्हणजे त्यांची उत्कृष्ट विचारबुद्धिमत्ता आणि शब्दांनी मनाला भिडणारी शैली ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि शब्दांतून लोकांना आकर्षित करण्याची आणि प्रभावीपणे आपली भारतीय जनता पार्टीची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांचे निर्भीड आणि कणखर नेतृत्व जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नेहमीच अग्रभागी असते.

​असे हे समर्पित, निष्ठावान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेले  शेखर नाना खरमरे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य असेच अखंडितपणे सुरू राहो, ही सदिच्छा!